करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे दोन दिवसात खात्यावर जमा करणार – तुषार ठोंबरे

करमाळा समाचार


करमाळा तालुक्यातील करमाळा, कोर्टी, रायगाव या सर्कल मधील गतवर्षीचे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई चे राहिलेले रक्कम दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू असे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे,
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,
शिवसेनेचे प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर त्यांनी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना भेटून या सर्कलमधील नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी अशी विनंती केली.

करमाळा तालुक्यातील बाकीच्या सर्कलचे नुकसान भरपाई जमा झाली मात्र कोर्टी व करमाळा सर्कलचे नुकसान भरपाई जमा झाली नव्हती. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात महेश चिवटे यांनी तुषार ठोंबरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.

politics

करमाळा तहसीलदार नसल्यामुळे अनेक सर्वसामान्यांची कामे रखडले असून यामुळेच अशी शेतकऱ्यांची जमा असणारी रक्कम वितरित होत नाही. यावेळी ठोंबरे यांनी तात्काळ या संदर्भातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवून अतिवृष्टीची नुकसान भरपाई यादी प्रसिद्ध करून पैसे वितरित करण्याची कारवाई सुरू करावी असे आदेश दिले.

येत्या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न करू अशी आश्वासन देऊन ज्या शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असेल ती केवायसी तात्काळ बँकेत जाऊन पूर्ण करावी व महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा असे आव्हाने ठोंबरे यांनी केले.

अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे करमाळा ग्रामीण मधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्याला मिळाली नव्हती. करमाळा तालुक्यातील बाकीच्या सर्कलमधील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली. आता मात्र अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यामुळे येथे आठवड्यात सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील व दिवाळीच्या सणासाठी शेतकऱ्याला हा पैसा मदतीचा आधार ठरेल असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी यांनी व्यक्त केला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE