करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तालुक्यातील बऱ्याच गावात नेत्यांना गावबंदी ; आळजापुरच्या ग्रामस्थांनी दिले निवेदन

करमाळा समाचार

आळजापुर तालुका करमाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने आज करमाळा येथे तहसीलदार मराठा समाजाच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण होत नाही व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचे ठरवले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले आहे.

चाळीस दिवसाचे मुदत दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी अमर उपोषणाचा मार्ग निवडला आहे. तर सर्व तालुक्यांमध्ये तहसील परिसरात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने करमाळ्यातही मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. तालुक्यातील सर्व गावात नेत्यांना बंदी घालण्यात येऊ लागली आहे. तर करमाळा येथे साखळी उपोषणास पाठिंबा देत हजरी लावत प्रत्येक गावातून वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. तर प्रत्येक घरातील एकातरी सदस्यांनी संबंधित आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. हरिदास केवारे, सरपंच संजय रोडे, उपसरपंच ॲड. नितीन गपाट, माजी सरपंच बिभिषन खरात, भाऊसाहेब रोडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील काळे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गायकवाड, कैलास रोडे, दत्तात्रय टेंबाळे आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE