कारखान्याच्या प्रदुषण नियंत्रण यंत्रणेवर प्रशासनाचे शुन्य नियंत्रण
करमाळा समाचार
करमाळा शहराच्या लगत असलेल्या साखर कारखान्यातच्या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याने देवीचा ग्रामस्थ व शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या कारखान्यामुळे प्रदूषण नियंत्रणाचे तीन – तेरा झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे रहिवाशांसह रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारी येण्याआधी प्रशासन का लक्ष घालत नाही हा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणेच्या नियंत्रणावर प्रशासनाचे मात्र शुन्य नियंत्रण असल्याचे दिसते.
देवीचामाळ परिसरात असलेल्या श्री. विठ्ठल (कमलाई) शुगर फॅक्टरीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून या भागात बॉयलर मधून निघणारी काजळी व बारीक कण यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तर दुचाकीवरून जाणाऱ्या चालकांच्याही डोळ्यात बारीक कण गेल्यामुळे डोळे लाल होणे, घशात खवखवणे अशा प्रकारचे त्रास जाणवू लागले आहेत.
देवीचामाळसह शहरात अनेक ठिकाणी काजळीचे थर साचण्याचे दिसून येते अनेकांना याचा त्रास होतो याबाबत चर्चाही रंगतात पण कारखान्याला त्यांची चूक दाखवून देण्याची तयारी कोण दर्शवत नाही. मागे काही दिवसांपूर्वी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सदरच्या बाबत तक्रार केली होती. काही दिवस त्यावर नियंत्रण आले परंतु पुन्हा तसाच त्रास होऊ लागला आहे.
थोडक्यात मांडले आहे. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर सविस्तर मांडणी करण्याचा प्रयत्न राहिल. याशिवाय आपणास आलेल्या अनुभव आपण 9404692440 या क्रमांकावर शेअर करु शकता.