शिवस्मारक समिती शेटफळ व समस्थ ग्रामस्थांकडून जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा
चिखलठाण (बातमीदार)
शेटफळ ता करमाळा येथे शिवस्मारक समिती शेटफळ व समस्थ ग्रामस्थांकडून जिजाऊ जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व ग्रामपंचायत कार्यालय शेटफळ येथे
मनोहर दत्तात्रय पोळ, नागनाथ साबळे, सरपंच पांडुरंग लबडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊस पुष्पहार घालून व जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले .

१२ जानेवारी हा जिजाऊ मांसाहेबांचा जन्मदिवस. ज्या जिजाऊंनी शिवराय घडविले, स्वराज्याची आस जागवली, अन एक भव्य दिव्य स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर प्रत्यक्षात आणले. त्यांचा जन्मदिवस म्हणजे तमाम मराठी माणसाचा आनंदोत्सव! हा उत्सव शेटफळ येथे साजरा केला.

यावेळी माजी सरपंच विकास गुंड, भाऊसाहेब साबळे, सुहास पोळ, सचिन पोळ, तुकाराम चोरगे, बाळासाहेब पोळ, नानासाहेब पोळ, विशाल पोळ, आनंद नाईकनवरे, अमित घोगरे, काकासाहेब गुंड, विठ्ठल गुंड, रणजित लबडे, शंकर पोळ, आजिनाथ कळसाईत, अमोल पोळ, अर्जुन नाईकनवरे, राजेश पोळ, रोहित लबडे, नितीन धेंडे, धनाजी गायकवाड, आण्णासो पाटील, लिलाधर पोळ, उमेश घोगरे, बापूराव पोळ, भुजंग गोरे , गणेश पोळ, किरण घोगरे, अक्षय गुंड, बाबु डिगे यांच्यासह शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.