करमाळाकृषीताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

गट शेतीची किमया खर्च कमी नफा दुप्पट, दुष्काळातही कुंभारगावचे शेतकरी लखपती

करमाळा – विशाल घोलप

यंदा अल नीनो च्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, खरीप हंगामात तर जिरायत क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पेरणीच झाली नाही पण अशाही प्रतिकूल परिस्थितीत करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेतीच्या माध्यमातून फुलवलेल्या तुरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सदरच्या गटशेतीत सोळा एकर क्षेत्र तर तेरा शेतकरी सहभागी आहेत.

आधी १५ हजार एकरी खर्च होत असे आता योच खर्च साडे आठ हजार येत आहे. शिवाय मागील वेळी साडे तीन क्विंटल एकरी उत्पादन मिळत होते तेच आता बारा क्विंटल पर्यत गेले आहे. बीयानांच्या मागेही फायदा झाला आहे. खासगी दुकानातुन खरेदी केलेल्या पाकिटामागे पन्नास रुपये असा आठ हजारांचा फायदा झाला आहे. तर मजुरांचा ताप आणि खर्च दोन्ही वाचला असुन प्रत्येकी दहा हजारा पेक्षा जास्त बचत झाली आहे. एकुण गटात दोन लाख मजुरांचे वाचले आहेत. यासर्व प्रक्रियेत पाणी फाऊंडेशनने मोलाचे मार्गदर्शन केले गटाला प्रशिक्षण दिले त्याशिवाय कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडुन ऑनलाईन मार्गदर्शन दिले आहे.

politics

पानी फौंडेशन शेतकरी गटांमधे पीक स्पर्धा घेत आहे . कुंभारगाव मधील तरुण शेतकऱ्यांनी देखील पानी फौंडेशन ची ट्रैनिंग घेऊन एकत्र येत गटाची स्थापना केली व फार्मर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. पावसाची अनिश्चितता असल्याने कमी पाण्यावर येणारे तुरीचे पीक घेण्याचे ठरिवले. गटाने एकत्र येऊन बियाणे व निविष्ठांची खरेदी केल्याने गटाची बचत झाली तसेच इरझिक पद्धतीने एकमेकांच्या शेतात काम केल्याने मजुरांची समस्या सुटून खर्च कमी झाला. ठिबक सिंचन पद्धितीचा वापर केल्याने पाण्याचे योग्य नियोजन झाले. एकात्मिक कीड व रोग नियंत्रण केल्याने महागड्या औषधी व फवारण्यांचा खर्च कमी झाला. सर्व शेतकऱ्यांनी नियमित शेतीशाळेत भाग घेऊन शास्त्रज्ञाचें मार्गदर्शन घेत गेले व सर्व SOP ची अंमलबजावणी केल्याने तुरीचे बहारदार पीक डोलू लागले आणि जवळच्या भागातील शेतकरी तूर पाहायला गर्दी करू लागले. गटातील शेतकऱ्यांनी सरासरी एकरी १२ क्विंटल तुरीचे उत्पादन काढले आहे, सेंद्रिय तुरीला चांगली मागणी असून १० ते १२ हजार प्रति क्विंटल दर मिळणार असून अशा दुष्काळी परिस्थिती ही एकरी लाख रुपयांचा नफा मिळाल्याने शेतकरी खुश आहेत.

आम्ही पेरणी पासून ते मळणी पर्यंत ची सर्व कामे एकत्र केल्याने उत्पादन खर्च निम्म्यापेक्षा कमी करू शकलो तर उत्पादन दुप्पट करू शकलो.
– महेंद्र देशमुख , गटाचे अध्यक्ष

बीजप्रक्रिया, खत व पाणी यांचे योग्य नियोजन , एकात्मिक कीड नियोजन अशा शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेल्या सर्व बाबींची पूर्तता केल्याने विक्रमी उत्पादन घेता आले असे मत एकरी १८.२० क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले .
-राहुल राऊत, कुंभारगाव.

करमाळा तालुक्यात एकुण पन्नास गट पाणी फाऊंडेशन अंतर्गत काम करत आहेत. यंदा दुष्काळ परिस्थीती असल्याने काही गट पेरणी करु शकले नाहीत. पण माध्यमातुन कुंभारगाव सह जिजाऊ महिला गट फिसरे व रॉयल शेतकरे गट सौंदे यांनीही उत्कृष्ट काम करुन तुरीचे पिक घेतले आहे. कुंभारगाव इतर शेतकऱ्यांना आदर्शवत काम करीत आहे.
– सत्यवान देशमुख, जिल्हा समन्वयक, पाणी फाऊंडेशन सोलापुर.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE