तालुका स्तरीय खुली भव्य काव्यवाचन स्पर्धा ; भरघोस बक्षीसांसह पारितोषिक
करमाळा समाचार
करमाळा साहित्य मंडळ व ग्रामसुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २५/२/२०२४ रोजी दुपारी ठीक ३:०० वा.भव्य अशा खुल्या काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम बक्षीस ५००१ /- रोख आकर्षक ट्रॉफी – श्री.गणेश चिवटे ( अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान) व संयोजनासाठी ५००० अशी एकूण १०,००० देणगी

द्वितीय बक्षीस ३००१/- रोख व आकर्षक ट्रॉफी कै.तेजीबाई व पन्नालाल खाटेर स्मृती पुरस्कार श्री.श्रेणिकशेठ खाटेर (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या कडून
तृतीय बक्षीस २००१/- रोख व आकर्षक ट्रॉफी कै. सोनल माने स्मृती पुरस्कार प्राचार्य श्री.नागेश माने यांच्याकडून
उत्तेजनार्थ १००१ रोख व ट्रॉफी कै. तुकाराम हिरडे (गुरुजी) स्मृती पुरस्कार
श्री.अ़ॅड.डाॅ.बाबुराव हिरडे यांच्याकडून
उत्तेजनार्थ १००१/- रोख व ट्रॉफी श्री.नाथाजीराव शिंदे साहेब यांच्याकडून
देण्यात येणार आहे..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.गणेश चिवटे ( अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान) असतील, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. श्रेणिकशेठ खाटेर (सामाजिक कार्यकर्ते ) व प्रमुख उपस्थिती प्राचार्य श्री.नागेश माने सर असतील.
स्पर्धकासाठी नियम व अटी
१) स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे.
२)कविता स्वरचित असावी , दीर्घ नसावी.
३) कविता सादरीकरणासाठी 3 मिनिटांचा वेळ असेल
४)प्रत्येक कवीला/कवयित्रीला एकच कविता सादर करता येईल.
५) सदर स्पर्धा फक्त तालुक्यातील कवीसाठी मर्यादित आहे.
६)कविता सादरीकरणासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
७)नाव नोंदणी २४/२/२०२४ पर्यंत स्विकारली जाईल.
नाव नोंदणीसाठी संपर्क
कवी. खलील शेख ७३८७४४६७७१
कवी.दादासाहेब पिसे ८३२९९०७४२४
सदर काव्य वाचन स्पर्धा
मा.आ.जयवंतरावजी जगताप बहुउद्देशीय सभागृह,किल्ला वेस,महादेव मंदिरासमोर
याठिकाणी होईल..
तरी तालुक्यातील तमाम कवी/कवयित्री नी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा व काव्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन
प्रकाश लावंड, अ़ॅड.डाॅ.बाबुराव हिरडे,नाथाजीराव शिंदे,सौ.सुनिता दोशी, सौ.मंजिरी जोशी,दीपक लांडगे,संतोष कांबळे,अ़ॅड.सौ.अपर्णा पदमाळे, नवनाथ खरात, तेजस धेंडे,प्राची सरवदे,सौ.ऋतुजा वीर, दिग्विजय देशमुख, सौ.स्वाती माने,हरिभाऊ हिरडे,सोमनाथ टकले,अनिल माने,अजित कणसे,व्ही.आर.गायकवाड,संजय हांडे,सौ.रेश्मा दास,मोरेश्वर पवार,अंगद बिडवे, बाळासाहेब गोरे,गजेंद्र पोळ,अर्चना माने,विलास यादव,हनुमंत जाधव यांनी केले आहे.