करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

योजना नाही तर मतदान नाही ; चाळीस गावांचा निवडणुकीवर बहिष्कार !

करमाळा समाचार – नाना घोलप

रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी वीट येथे करमाळा पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर योजना मंजूर नाही झाली तर उपस्थित सर्व चाळीसगावातील शेतकरी बांधव निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या चा निर्णय घेण्यात आला
या आंदोलनामध्ये लाभ क्षेत्रातील चाळीस गावातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी चाळीस गावातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच शहाजी माने, वीट सरपंच महेश गणगे, रावगाव सरपंच संदीप शेळके, अंजनडोह सरपंच अरुण शेळके, राजूरी सरपंच शेळके, सरपंच मारकड, वंजारवाडी सरपंच प्रवीण बिनवडे, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, कामोने सरपंच नलावडे, झरेचे प्रशांत पाटील, प्रा. रामदास झोळ, अर्जुन गाडे, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, अण्णासाहेब सुपनवर, गोरख ढेरे, अभयसिंहराजे भोसले, उदय ढेरे, प्रशांत शिंदे तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व सरपंच पदाधिकारी व शेतकरी यांच्यावतीने देण्यात आलेले निवेदन मंडल अधिकारी श्री. बागवान यांनी स्वीकारले यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक पोपट टिळेकर, हवालदार अझर शेख यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE