नितीनराजे साखरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
करमाळा समाचार – संजय साखरे
राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी नितीनराजे रेवणंनाथ साखरे यांची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर ता. मोहोळ येथे इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे.
श्री राजेश्वर विद्यालयात शिकत असताना त्याने श्रद्धा क्लास मांगेवाडी सरवडे ता. राधानगरी जि. कोल्हापुर येथे या परीक्षेची तयारी केली होती .यासाठी त्याला श्रद्धा क्लासेसचे संचालक श्री दीपक भोसले सर, पाचवीचे वर्गशिक्षक श्री अवघडे सर व मुख्याध्यापक श्री अनिल झोळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
