E-Paperकरमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून फरार असलेले जामखेड चे माजी उपसभापती करमाळा पोलिसांनी केले गजाआड

करमाळा समाचार 

पोलीस ठाणे भाग 5 गुरंनं 772/20 20 भादवि कलम 353 379 332 336 323 504 506 147 149 व पर्यावरण कायदा कलम 9 व 15 मधील फरार आरोपी नामे दीपक नानासाहेब वाळुंजकर रा जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हा एक वर्षापासून फरार होता.

आज दिनांक 29. 5. 2021 रोजी संशयीत आरोपी दीपक नानासाहेब वाळुंजकर रा. जवळा तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर हा पोथरे गावच्या शिवारात आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर, पो कॉ चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल तोफिक काझी, कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी फरारी आरोपी नामे दीपक नानासाहेब वाळुंजकर यांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.

सदरची कामगिरी ही  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,  उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि तळपे हे करीत आहेत

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE