करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

50 टक्के अनुदान – शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलीत अवजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे ; अर्ज करा

करमाळा समाचार 

जिल्हा परिषद सेस 2024-25 अंतर्गत, डीबीटी तत्वावर शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलीत अवजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे 50% किंवा जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या अधिकतम मर्यादित अनुदानावर देण्यात येणार आहेत, यासाठी गरजू शेतकऱ्यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायत समिती करमाळा येथे विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत श्री पिस्टन स्प्रे पंप, नॅपस्याक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ब्रश कटर, सोलर इन्सॅट ट्रॅप, रोटावेटर पलटी नांगर, रोटरी टिलर विडर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, पाच एचपी सबमर्सिबल पंप संच, डिझेल इंजिन, कडबा कुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर इत्यादी साधने देण्यात येणार आहेत.

अवजारांसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर उद्दिष्टानुसार, सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यास पत्राद्वारे कळविण्यात येईल. त्यानंतर त्यांनी खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून, आपल्या पसंतीची, बीआयएस किंवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणीकरणानुसार व तांत्रिक निकषा नुसार मंजूर अवजार खरेदी करावयाची आहेत. मंजुर अवजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी प्रणाली द्वारे अदा करण्यात येईल.

ads

इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा 7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पासबुक ची पहिल्या पानाची झेरॉक्स, लाभार्थी अनुसूचित जाती किंवा जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग शेतकरी असल्यास युडीआयडी कार्ड झेरॉक्स, ट्रॅक्टर अवजारासाठी स्वतःच्या नावाचे आरसी बुक ची झेरॉक्स, कडबा कुट्टी व पाच एचपी साठी लाईट बिलाची झेरॉक्स, जनावरे असल्याबाबत दाखला इत्यादी कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायतसमिती कार्यालयातील बारणीशीमध्ये दाखल करून पोहोच घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE