करमाळासोलापूर जिल्हा

मकाईवर शेतकरी संघटनेचे आंदोलन ; बागलांचा संयम सुटला – दोन्ही गटांवर परस्परविरोधी तक्रारी

करमाळा समाचार

संपुर्ण विडिओ Dsp news वर

मकाई सहकारी साखर कारखान्यावर मागील वर्षीची थकबाकीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रात घुसुन कारखान्याचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे चिडलेल्या मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांचा संयम सुटला व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित इतरांनी वाद वाढु नये याची काळजी घेतली. सदर प्रकारानंतर दिग्विजय बागल यांच्यासह तिघांवर तर स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी मकाई अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह तीन अनोळखी व्यक्ती विरोधत गुन्हा दाखल झाला आहे. तर बागल यांनी केलेल्या तक्रारी नंतर विनापरवाना कारखान्यात घुसुन दमदाटी शिवीगाळ व आर्थीक नुकसान केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे रा. तुंगत ता. पंढरपूर, ऱविद्र गोडगे रा. पुर्व सोगाव, दिपक शिंदे व तानाजी शिंदे रा. जातेगाव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*मकाई चेअरमन दिग्विजय बागलांचा संयम सुटला ; शेतकरी नेत्याने केले मारहाणीचे आरोप तर बागलांनी दिले स्पष्टीकरण*

*video – मारहाण, आरोप आणी स्पष्टीकरण*-

याबाबत अधिक माहीती अशी की, शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास मकाई सहकारी साखर कारखान्यावर मागील थकबाकी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अचानक आंदोलन पुकारले व चालू कारखान्या असतानाच गव्हाणीत जाऊन बसण्याचा प्रयत्न करून कामकाज बंद पाडले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र खाटमोडे यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांची समजूत घालून त्यांना पैसे जमा करीत असले बाबत पत्र दिले. तर उर्वरित एकशे तेवीस रुपये आठवड्याच्या आत जमा होतील असे कळवले होते.

त्यानंतर माघारी जात असताना दिग्विजय बागल हे कारखाना स्थळावर आले. यावेळी आंदोलक माघारी दिग्विजय बागल यांच्याकडे वळाले त्यावेळी बागल व आंदोलक समोरा समोर आल्यानंतर दिग्विजय बागल यांचा संयम सुटला व त्यांनी जिल्हाध्यक्ष रणदिवे यांना कानशिलात लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो प्रयत्न फसला व शेजारी उभे असलेल्या इतरांनी बागल यांना बाजूला ओढले व वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बागल यांनी ज्या शेतकऱ्यांची देणी शिल्लक असतील अशांनी पावत्या समोर आणाव्या त्यांचं आपण पाहू असे आश्वासन देऊन त्या सर्वांना सोबत घेऊन चर्चा केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचे मंदीर टीकले पाहिजे आमची इच्छा…

मकाई साखर कारखान्याचा गाळप परवाना नाकारला आहे. परवाना नसतानाही बेकायदेशीर रीत्या हा कारखाना एक महिन्यापासून सुरू आहे.आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखान्यावर मागील थकबाकी द्या म्हणून गेलो असता. आम्ही गव्हाणीत बसुन गाळप बंद केले. यावेळी एम डी यांनी आम्हाला २२०० रुपये प्रमाणे जमा करु व उर्वरित रक्कम लवकर जमा करु सांगितले. आम्ही माघारी जात असताना अध्यक्ष बागल समोरुन गावगुंड घेऊन आले व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. गाळप परवाना नसताना गाळप असल्याने कारवाई व्हावी. थकबाकी द्यावी.
विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना

 

माझी राजकीय बदनामी करुन …कारखाना बंद पाडायचा डाव 

मी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याना सांगण्याचा प्रयत्न केला की २२०० प्रमाणे पैसे जमा केलेले आहेत. राहिलेले आहेत ते सुद्धा काही दिवसात जमा होतील. कारखाना अडचणीतून जातोय फार कष्टाने कारखाना उभा केलेला आणि चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे. आमची बाजू थोडी समजून घ्या असे मी फोनवर त्यांना सांगितलं. तरीही त्यांनी जाणून बुजून माझी राजकीय बदनामी करायची या कारणाने कारखाना बंद पाडण्याचा प्रकार केला. माझ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार केला. कारखान्याच्या वॉचमनच्या अंगावर गाडी घातली. शिवीगाळ करुन कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे प्रकरण मुद्दाम रंगवायचे होते. तसे ते त्या तयारीत होते. शेवट त्यांनी उकसवले व माझा संयम सुटला.
दिग्विजय बागल, अध्यक्ष मकाई स. सा. कारखाना.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE