करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

टर्मिन विकणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यात ; इतर विक्रेते रडारवर पो.नि. घुगेंची करवाई

करमाळा समाचार

शरीरयष्टी सुधारण्यासाठी टर्मिन सारख्या औषधींचा वापर केला जात असल्याबाबत करमाळा पोलिसांनी करमाळ्यात दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तेरा बॉक्स औषधे मिळून आली आहेत. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करीत आहेत. या संदर्भात करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कडक धोरण अवलंबवले त्यामुळे सदरची कारवाई पूर्ण होऊ शकली आहे. सदरची कारवाई दि ३० रोजी रात्री आकरा वाजता देवीचामाळ रस्त्यावर पेट्रोल पंपाशेजारी करण्यात आली. याकारवाई मुळे यात सामील असलेल्या टर्मिन व इतर घातक औषधी विकणाऱ्यांचे धाबे दणाणून गेले आहेत.

सजित चंदुमल सिंधी रा. फुलसुंदर चौक, करमाळा ता. करमाळा, विजय विलास क्षिरसागर, वय २२ वर्षे, रा. मंगळवार पेठ, करमाळा, ता. करमाळा असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शरीरयष्टी कमावण्यासाठी युवकांमध्ये औषधे घेण्याचे प्रमाण वाढले होते. तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्य तसेच शरीरावर होताना दिसत होता. करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे स्वतः एक मल्ल असल्याने त्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत आपल्या पोलीस पथकाला याबाबत सूचना दिल्या.

politics

त्यानंतर करमाळा पोलिसांनी सापळा रचत क्षीरसागर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने सिंधीचे नाव समोर आले आता अशा प्रकारचे किती लोक या व्यवसायात आहेत याचा शोध पोलिस घेणार आहेत. यावेळी त्यांच्याकडुन मेफेन टर्मिन सल्फाईड इंजेक्शनचे तेरा बॉक्स त्यामध्ये प्रत्येकी दहा मिलीच्या पाच काचेच्या सीलबंद बाटल्या एकूण १९ हजार १६२ रुपये किमतीचे ताब्यात घेतले आहेत सदर औषधे हे “परिशिष्ठ एच” प्रवर्गात मोडत असल्याने ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिठ्ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, व त्याचे खरेदी बिल नसताना अवैद्य मार्गाने प्राप्त करुन अशा औषधाचे वापरामुळे स्वास्थास जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे.

तसेच त्यातील विषारी द्राव्याचे दुष्परीणाम होवून इंजेक्शन घेणारे व्यक्तींचे जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर दुखापत होवू शकते हे माहीत असताना वरील इंजेक्शन अवैधरीत्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्या उददेशाने अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरीता आपले कब्जात बाळगले व विक्री केली म्हणून कारवाई केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक विनायक माहुरकर करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE