मोटारसायकल चोरी प्रकरणी पोथऱे येथील एकास अटक
करमाळा समाचार
करमाळा शहरातील शिवाजीनगर येथून एक होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल १७ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चोरीला गेली होती. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करीत असताना एकास ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोथरे येथील संशयीत आकाश दीपक गायकवाड वय २१ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करमाळा पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेली मोटरसायकल ही आकाश गायकवाड कडे असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई मनिष पवार, सोमनाथ जगताप, मिलींद दहिहंडे, हवालदार भाऊसाहेब शेळके, मंगेश पवार आदिंसह डीबी पथकाने कारवाई केली. पुढील तपास शेळके यांच्याकडे आहे.