महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन तालुकाध्यक्ष पदी वारे पाटील तर सचिवपदी झिंजाडे यांची निवड

करमाळा समाचार 

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन तालुकाध्यक्ष पदी अतुल वारे पाटील,सचिव पदी नितीन झिंजाडे, तालुका कार्याध्यक्ष पदी पांडुरंग भगत तर उपाध्यक्ष पदी नंदकिशोर वलटे यांची एकमताने निवड करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, जिल्हाध्यक्ष संतोष भोसले,राज्य प्रसिद्धी प्रमुख ओंकार आडत, आदींच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड अजिनाथ शिंदे, सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव आदी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे यांनी डिजिटल मीडियातील पत्रकरांच्या विविध समस्या सोडवणे तसेच त्यांचे संघटन करून आदर्श पत्रकारिता प्रस्थापित होण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली असून भविष्यात डिजिटल मीडिया पत्रकारांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांच्या सोबत राहून संघटना काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष भोसले यांनी बीड येथील जिल्हा माहीती अधिकारी यांनी डिजिटल मीडिया पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करत या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी संघटना प्रयत्नशील असून भविष्यात डिजिटल मीडियातील पत्रकारांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय स्तरावर ही संघटना कार्यरत असल्याचे सांगितले. सचिव नितीन झिंजाडे यांनी आभार मानले.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!