करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अजितदादांच्या पदाधिकाऱ्या विरोधात नितेश राणेंचा हिंदु जन आक्रोश मोर्चा

करमाळा समाचार

शहरातील एका ठिकाणच्या अतिक्रमणाबाबत करमाळ्यात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दत्त मंदिर ते छत्रपती चौक मोर्चा काढण्यात आला. तर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सदर मोर्चाचे नेतृत्व भाजपचे नेते नितेश राणे यांनी केले होते. विशेष म्हणजे सदरचा मोर्चा हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट च्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांविरोधात असल्याने नेमके भाजप नेत्यांना काय साध्य करायचे आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात लँड जिहाद सुरू असल्याचे सांगून करमाळा शहरातील सरकारी जमिनीवरील अवैध बांधकाम व कब्जा असल्याचे कारण देत करमाळा शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याचे नेतृत्व नितेश राणे यांनी केले.

politics

मुळातच सध्या राज्य तसेच केंद्र सरकार हे भाजप तसेच महाराष्ट्रात महायुती सरकार आहे. जर सदरची जागा ही अवैध स्वरूपात कब्जात असेल तर नियमाप्रमाणे संबंधित खाते व विभागाने त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. सरकार भाजपचेच असताना भाजपच्याच नेत्यांना अशा प्रकारचे आंदोलने का करावे लागत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदरचे आंदोलनात छत्रपती चौक येथील ज्या कुटुंबाचे गाळे आहेत. त्या कुटुंबातील सदस्य अजित पवार गटाच्या संबंधित पक्षात पदाधिकारी युवक शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर त्यांचे इतर नातेवाईकांपैकी एक पुणे येथे माजी महापौर पदावर काम केलेले आहे. तर नितेश राणे यांनी करमाळा येथे केलेले आंदोलन उघडपणे एका विशिष्ट जाती धर्माकडे वळवलेले असताना इतर अतिक्रमणांबाबत कोणताही शब्द काढलेला नाही. केवळ एकाच जागेबाबत आक्रमक होत थेट आव्हान देण्यात आल. पण ते आव्हानही महायुतीत सरकारमधीलच घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबाविरोधात दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE