करमाळासोलापूर जिल्हा

खबरदार मतदानासाठी शपथ दिली तर होऊ शकते कारवाई ; तसेच चौदा गावे संवेदनशील म्हणुन घोषित

करमाळा समाचार

तालुक्यातील चौदा गावे संवेदंशील म्हणुन घोषीत केली गेली आहेत. त्यामध्ये देवळाली, पोथरे, मांगी, निमगाव ह, साडे, बोरगाव, नेरले, पिंपळवाडी, सावडी, उमरड, श्रीदेवीचा माळ, हिसरे, हिवरवाडी, जातेगाव आदि गावांचा समावेश आहे अशी माहीती पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली आहे.

१०७ कलमाप्रमाणे एकूण २७६ इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कलम ११० प्रमाणे एकूण २३ कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये तहसिल कार्यालयाकडून ३ बाॅण्ड आणि स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांचकडील १३ बाॅण्ड असे एकूण १६ बाॅण्ड घेतलेले आहेत. कलम १४४ प्रमाणे एकूण ९५ इसमांवर मतदानाचे दिवशी तडीपार करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात येवून तडीपार होणेबाबत ९५ नोटिस काढण्यात आलेल्या आहेत.
कलम १४९ प्रमाणे करमाळा पोलीस ठाणेस यापुर्वी विविध कारणांवरून दाखल गुन्ह्यातील एकूण २५७
इसमांना नोटिस बजावण्यात आलेल्या आहेत.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुशंगाने करमाळा तालुक्यातील एकूण ५१ ग्रामपंचायत
पैकी सालसे आणि जेऊरवाडी या ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत. उर्वरित ४९
ग्रामपंचायतीच्या निवडणूका पोटनिवडणूक सह एकुण ५६ गावांमध्ये निवडणूक होणार असुन १५९ बुथ आणि ६७ इमारतीत पार पडणार आहे. यावेळी मोठा फौजफाट्यासह अनेकांवर कारवाई करण्यात आलेली माहीती पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली. तर शपथ वाहणे किंवा दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

सदर निवडणुकीकरता एक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह दोन पोलिस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलिस निरिक्षक, तीन पोलिस उपनिरिक्षक व १२५ पोलिस अंमलदार, एक राज्य राखीव दलाची २५ कर्मचारी तुकडी आणि ९६ होमगार्ड असा बंदोबस्त नेमलेला आहे. तसेच निवडणूक अनुशंगाने मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरीता करमाळा पोलीस विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE