करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महिला व बालकल्याण विभागाकडुन महिला व मुलींसाठी वैयक्तिक योजना ; अर्ज करण्याचे आवाहन

करमाळा समाचार

सन २०२४-२५ जिल्हा परिषद सेस अंतर्गत वैयक्तीक योजना करीता लाभार्थी यांचेकडुन वैयक्तीक योजनांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध योजनांचा लाभ होणार आहे. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापुर यांच्या वतीने वैयक्तीक लाभांच्या योजना देण्यात आलेल्या आहेत. सदर योजनांचे प्रस्ताव अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

तरी सदर योजनांची पंचायत समिती स्तरावरुन प्रचार व प्रसिदधी देण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे …

politics

जिल्हा परिषद सेस मधील योजना
१. ग्रामीण भागातील ७ वी ते १२ पास महिला व मुलींना MSCIT संगणक प्रशिक्षण देणे.
२. महिला व मुलींना तांत्रिक, व्यावसायिक व कौशल्य वृदधी प्रशिक्षण देणे अंतर्गत ग्रामीण भागातील १० वी पास महिला व मुलींना टॅली संगणक प्रशिक्षण देणे.
३. ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी / मिरची कांडप यंत्र पुरविणे.
४. ग्रामीण भागातील महिलांना पिकोफॉल मशिन पुरविणे. ५. इ.५ वी ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुलींना सायकल वाटप करणे.

सदर महिला व बालकल्याण (DBT) विभागाशी निगडीत योजना बाबत श्री. गोरख एम. खंडागळे (कनिष्ठ सहाय्यक) मो.नं. ९६२३२५३०२२ समाजकल्याण / मबाक विभाग, पंचायत समिती करमाळा यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन मा. श्री. मनोज राऊत, गटविकास अधिकारी (वर्ग-१) पंचायत समिती करमाळा यांचेकडुन करण्यात येत आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE