करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तंबाखु देण्यास नकार एकाचे डोके फोडले ; गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

कोणत्या गोष्टीचा राग येऊन काय भूमिका घेईल कोण काही सांगता येत नाही. नुकताच जिंती परिसरात दोन ओळखीचे व्यक्ती एकत्र आले. एकाने दुसऱ्यास तंबाखू मागितली. त्याने नकार दिल्यानंतर जवळच असलेला दगड उचलून त्याने डोक्यात घातला आहे. या प्रकरणी दगड घालणाऱ्याच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अर्जुन शेलार वय 50 वर्षे धंदा. मजुरी रा. जिती ता. करमाळा यांनी तक्रार दिली आहे शेलार हे मोलमजुरी करून उपजीविका भागवतात ते आपल्या गावी असताना शेजारच्या गावातील व्यक्ती त्यांच्याकडे आला होता. यापूर्वीही दारू व इतर ठरावीक कारणातून अनेकदा भांडण झाल्याचे आपण ऐकले असेल. तसाच प्रकार नुकताच उघडकीस आल्याने यावर प्रतिक्रिया काय द्यावी असा प्रश्न लोकांना पडला आहे.

politics

शेलार हे जिंती गावच्या स्मशानभुमी जवळ आले असता मौजे भगतवाडी ता. करमाळा येथील त्यांच्या ओळखीचा राहुल ज्ञानदेव काळे हा भेटला. आणि त्याने शेलार यांच्याकडे तंबाखू खाण्यासाठी मागितली. परंतु तंबाखु नसल्याने त्यांनी त्यास तंबाखू दिली नाही म्हणून त्याने तेथेच पडलेला दगड उचलून शेलार यांच्या डोक्यात मारून जखमी केले व शिवीगाळी, दमदाटी करून तो तेथून पळून गेला आहे. म्हणून राहुल ज्ञानदेव काळे रा.भगतवाडी ता. करमाळा याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE