करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा सोलापूर बसचा टायर फुटुन अपघात चालकामुळे 117 प्रवासी वाचले ; निष्काळजीपणा चव्हाट्यावर

करमाळा समाचार 

करमाळा आगारातून सोलापूरसाठी निघालेल्या एसटी बसचा पुढचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने अपघात घडला आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीत तब्बत 117 प्रवाशी सुरक्षीत आहेत. चालकाने वेळीच गाडी बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सदरचा अपघात करमाळा सोलापूर मार्गावर कोंडी जवळ घडला आहे. सदरची गाडी आज सकाळी साडे सहाला सोलापूर कडे रवाना झाली होती.

करमाळा आगाराच्या निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार सूचना व माहिती देऊनही करमाळा आगारांमध्ये खराब झालेल्या बसेस तसेच नादुरुस्त टायर बसवल्याने गाड्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा गाडीच्या पाठीमागील टायर फुटल्याने गाडी वेळीच थांबवण्यात येते. परंतु गाडीचा समोरील टायर फुटून गाडी ताब्यात आणणे थोडेसे अवघड जाते. अशा परिस्थितीत करमाळा येथील आगारातील चालक जितेंद्र कांबळे यांनी प्रसंगावधान राखत गाडी वेळेत ताब्यात आणली म्हणुन मोठा अपघात टळला आहे.

politics

मुळातच चांगल्या सुस्थितीत असलेल्या एसटीमध्ये साधारण 60 ते 65 प्रवासी असणे अपेक्षीत आहे. तर जुन्या बस मध्ये हे प्रमाण अटोक्यात असायला पाहिजे. सदरच्या गाडीमध्ये तब्बल 117 प्रवासी असल्याने बसच्या टायरनेही अखेर जीव सोडला व अपघात झाला आहे. महामार्गावर गाडी धावताना वेगात असते. त्यात मागुनही वेगात गाड्या धावत असतात अशा वेळी ताबा सुटुन मोठा अपघात घडु शकला असता. वाहक चालकासह प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका संभवतो. त्यामुळे यातुन तरी करमाळा आगार धडा घेणे गरचे आहे.

यासंदर्भात वाहक व चालक यांनी करमाळा आगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आगार प्रमुखांचा संपर्क न झाल्याने इतरांना फोन केला. यावेळी जाधव यांनी तीनदा फोन करून एकदाही फोन उचलला नाही. तर थोड्या वेळानंतर मुसळे व आगार प्रमुख होनराव यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE