E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सोलापूर जिल्हा संघ निवड चाचणी ; २१ तारखे पासुन कुर्डुवाडीत

करमाळा समाचार

 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दिनांक 21 सप्टेंबर व 22 सप्टेंबर 2024 शनिवार, रविवार रोजी शिवराय कुस्ती संकुल कुर्डूवाडी येथे सोलापूर जिल्ह्याची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा निवड चाचणी होणार आहे.

politics

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वजने सकाळी 9 ते 11 या वेळेत घेतली जातील. तसेच स्पर्धा साडेअकरा वाजता चालू होईल. तसेच वेळेनुसार सामन्यांमध्ये बदल होऊ शकतो. तरी सोलापूर जिल्ह्यातील ज्या खेळाडुची जन्मतारीख सन 2009/ 10 /11 आहे अशा खेळाडुस 15 वर्षे वयोगटात खेळता येईल.

तसेच ज्या खेळाडुची जन्मतारीख सन 2007 /8 /9 आहे अशा खेळाडुस वयोगट 17 वर्षाखालील वयोगटात खेळता येईल. तर ज्या कुस्तीगिराची जन्मतारीख 2004/ 5 /6 /व 7 आहे
अशा खेळाडुस 20 वर्षे वयोगटामध्ये खेळता येईल. परंतु सन 2011 तसेच सन 2009 व सन 2007 जन्मतारीख असलेल्या खेळाडूला पालकांचे संमती पत्र व मेडिकल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

तसेच वयाचा पुरावा म्हणून ओरिजनल आधार कार्ड पासपोर्ट जन्माचा दाखला बोनाफाईट खेळाडूच्या सोबत असावे. तसेच जिल्हा बंदीचा नियम असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये खेळावे तसेच या स्पर्धेसाठी प्रवेश फी म्हणून शंभर रुपये घेतली जाईल. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE