करमाळासोलापूर जिल्हा

पोलिस पाटीलच निघाला वाळु माफिया ; पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफियाला दणका

प्रतिनिधी सोलापूर – करमाळा समाचार

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी
करत मौजे दसूर ता. माळशिरस येथील अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई 01 महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, 01 वाळूने भरलेली डम्पिंग ट्राॅली, मोटार सायकलसह एकूण 12 लाख 32 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे दसूर ता. माळशिरस जि. सोलापूर येथील गांवाजवळ असलेल्या ओढयातून दिवसा काही इसमांच्या मदतीने गांवातील पोलीस पाटीलच शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून अवैधरित्या वाळू काढून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांचे पथक वाखरी पंढरपूर भागात असल्याने त्यांना, तात्काळ कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

सपोनि मांजरे व त्यांचे पथक खाजगी वाहनाने मौजे दसून गांवात जावून पाहणी केली असता सदर ठिकाणी दिवसाच काही इसम गांवातील ओढयातून वाळू डम्पिंग ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्यावरून खात्री झाल्याने ट्रॅक्टर व डम्पिंग ट्राॅली वर लक्ष ठेवून सापळा रचला असता डम्पिंग ट्राॅलीमध्ये वाळू भरून गांवातून राजगे वस्तीजवळून जात असताना दिसून आला. तेंव्हा ट्रॅक्टर समोर एक इसम मोटार सायकलवर येत असताना दिसला. तेंव्हा सदर ट्रॅक्टरचा आम्हांस वाळू गुन्हयाच्याकामी संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता, मोटार सायकवरील इसमाने ट्रॅक्टर चालकास हातवारे इशारा करून ट्रॅक्टर राजगे वस्तीजवळ घेण्यास सांगितले. तेंव्हा त्याचा पाठलाग करीत असताना ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर राजगे वस्तीजवळील रोडवर सोडून पळून गेला. मोटार सायकलस्वारास जागीच पकडले. त्याची माहिती घेतली असता तो गांवचा पोलीस पाटील असत्याचे समजले.

सदर ठिकाणाहून 01 महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, वाळूने भरलेली 01 डम्पिंग ट्राॅली, 1 मोटार सायकल व ट्रॅक्टर मालकास ताब्यात घेण्यात आले असून एकूण 12 लाख 32 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत वेळापूर पोलीस ठाणेस गुरंन 43/2021 भादविकाक 379, 34 पर्यावरण कायदा 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE