करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अखेर प्रतिक्षा संपली – उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला भूलतज्ज्ञ

करमाळा समाचार


करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून या संदर्भात आरोग्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही आपण पाठपुरावा केलेला होता. त्यानुसार बदली प्रक्रियेमध्ये करमाळा तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील डॉ.अंकुश भाऊराव पवार यांची कायमस्वरूपी भूलतज्ञ म्हणून नियुक्ती झालेली असून ते हजर झाल्यानंतर येतील सिझेरियन व इतर शस्त्रक्रियेसाठी २४ तास उपलब्ध राहतील अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,२०१९ ते २४ या कार्यकाळामध्ये पूर्णवेळ कायमस्वरूपी भुलतज्ञ करमाळा तालुक्यासाठी लाभला नसला तरीही हंगामी स्वरूपात, कंत्राटी भूलतज्ञ या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले त्यामधून जवळपास ७०० मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पार पडल्या.

त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेचे लाखो रुपये वाचले. तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा लाभावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून दवाखान्याचे श्रेणीवर्धन करून १०० खाटाच्या दवाखान्याचे बांधकाम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यातील २० बेड हे अतिदक्षता विभागाचे आहेत. याबरोबरच रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम वेगात सुरू असून करमाळा तालुका आरोग्य विषयक सुविधांनी संपन्न करणे हेच आपले उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE