करमाळासोलापूर जिल्हा

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने ११ जुन ते २० जुन आरोग्य दिंडी

करमाळा समाचार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 11 जून ते 20 जून दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन तालुका अध्यक्ष संतोष वारे व युवा नेते अभिषेक आव्हाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवारी वृक्षारोपणाने सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस दीपालीताई पांढरे, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस रंजनाताई हजारे ह्या उपस्थित राहणार आहेत. 11 जून रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान किल्ला विभाग येथे वृक्षारोपण केले जाणार आहे.

तसेच कोरोना व म्युकरमायकॉसिस आजारावर माहिती, सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण केंद्राची माहिती देऊन लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे, कोरोना योद्ध्यांचा सन्मान समारंभ, रक्तदात्यांना हेल्मेट वाटप, गोर गरीब व गरजू लोकांना अन्नदान वाटप वाटप, कोरोनामुळे निराधार झालेल्या बालकांना व केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजना मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी नोंदणी शिबिर पावसाळ्यात उद्भवणारे आजार साथीचे रोग या पासून घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत शिबीर आदी विविध कार्यक्रम 11 ते 20 जून दरम्यान साजरे केले जाणार आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE