करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दिग्विजय बागल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया

करमाळा समाचार

करमाळ्याची जागा शिवसेनेला सुटावी व उमेदवार म्हणून आग्रही असलेले जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची दिग्विजय बागल यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी या निवडीबाबत समाधान व्यक्त करत तन मन धनाने कामाला लागण्याची आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

चिवटे यांची प्रतिक्रिया…
आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे उपस्थितीत दिग्विजय बागल यांना एबी फॉर्म देण्यात आला असून करमाळा मतदार संघातून एकनाथ शिंदे साहेबच उभा आहेत असे समजून सर्व शिवसैनिक तन-मनदानाने काम करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आम्हाला शिरसंवाद असून एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करणार आहे. तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची व्यूहरचना आखण्यात येणार असून करमाळात शिवसेनेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE