करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सभापतीपदाची ऑफर धुडकावणारे सावंत आता वेगळ्या विचारात ; नेमके काय घडले ?

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात नुकतेच एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भुमिकेनंतर सावंत गटानेही शिंदे गटाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे याच सावंत गटाला मागील काही दिवसांपुर्वी सभापदाची ऑफर दिली तरी ते सोबत गेले नव्हते पण अचानक असे काय घडले की सावंत सध्या वेगळ्या मुड मध्ये दिसत आहेत.

तालुक्याच्या राजकारणात कायम जगताप, बागल व पाटील यांच्या अवतीभोवती राजकारण फिरले आहे. त्यांनी पक्ष जरी बदलले तरी संबंधित कार्यकर्ते हे कायम त्या गटाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जाताना दिसले आहेत. त्यामुळे तालुक्यात पक्षाच्या राजकारणाला तितकेसे महत्त्व प्राप्त झालेली दिसून आले नाही. पण आता पक्षीय राजकारणही वाढू लागले आहे. त्यात गटागटाचे महत्व जैसे थे राहिले आहे. आजही गटातटाचे नेते अपेक्षित अशी निर्णय घेऊन निवडणुकांमध्ये यश मिळवतात हे दिसून आले आहे.

politics

जगताप, बागल व पाटील या गटांना कायमच छोट्या मोठ्या गटांचा आधार राहिला आहे. त्यामध्ये सावंत गट हा अतिशय महत्त्वपूर्ण असा गट मानला जातो. तर शिंदेंच्या राजकारणाच्या सुरुवातीला सावंत गटाची भुमिका महत्वाची होती. तालुक्यातील पांडे व रायगाव या जिल्हा परिषद गटात सावंत गटाचा कायम वरदहस्त राहिला आहे. या भागात सावंत गटाने कायम काम करत राहिले व आपला गट वाढवत गेले आहेत. करमाळा नगर परिषदेमध्येही सावंत गट महत्त्वाचा मानला जातो. नगराध्यक्ष पदाबाबतही त्यांचा विचार अनेकदा करण्यात आला आहे. त्यामुळे सावंत यांना मोठ्या गटांकडून कायमच वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या होत्या. पण सावंत यांनी त्यांची भूमिका योग्य त्यावेळी घेतलेली दिसून आली.

मागील समितीच्या निवडणुकांमध्ये पाटील गटाकडे सत्ता आली होती. यामध्ये सुरुवातीला राखीव मतदारसंघ असल्याने तिथे सभापती म्हणून गाडे यांची वर्णी लागली. त्यानंतर मात्र सभापती बदलाचे वारे वाहत होते. यादरम्यान पंचायत समिती सदस्य असलेले राहुल सावंत यांना पाटील गटाकडून सभापती पदाची ऑफर देण्यात आली होती अशी खात्रीलायक माहीती आहे. त्या बदल्यात पाटील यांचे काम सावंत यांनी करणे त्यांना अपेक्षित होते. पण सभापती पद म्हणजेच मिनी आमदारपद धुडकावत सावंत यांनी शिंदे गटासोबत राहणे पसंत केले. आजतागायत ते शिंदे यांच्या सोबतच काम करत होते. पण आता त्यांनी आपली भूमिका बदललेली दिसून येत आहे. अचानक असे काय घडले की सावंत यांनी भूमिका बदलली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आज होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळू शकतील अशी शक्यता आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE