करमाळासोलापूर जिल्हा

प्रा. डॉ.मच्छिंद्र नागरे यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार प्रदान

केम- संजय जाधव

येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे यांना नवोपक्रमासाठी राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे, मा. सरपंच श्री अजितदादा तळेकर , मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, शालेय समिती अध्यक्ष श्री मोहनराव दौंड, मा. अजीव सेवक श्री पाटील डि.व्ही., प्राचार्य श्री रामेश्वर गवळी यांच्या शुभहस्ते डॉ. नागरे यांना कर्तुत्ववान राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कारासाठी राज्यभरातून विविध ज्युनियर कॉलेजमधून प्रस्ताव मागितले होते.डॉ. नागरे यांनी उत्तरेश्वर कॉलेजमध्ये वृक्षारोपण चळवळ, स्वच्छता अभियान, डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन, जागर नवदुर्गांचा, आरोग्य आपल्‍या दारी, वाचन कट्टा असे विविध नवोपक्रम राबवून या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. याच कार्यक्रमात कोरोना लॉकडाउन काळात वेगवेगळ्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदवून यश मिळविलेल्या याच कॉलेजच्या उपक्रमशील विद्यार्थिनी कु.सानिका तळेकर, कु, ज्योती तळेकर, कु.यशोदा दीक्षित, कु. लक्ष्मी देवकर, कु. शुभांगी शिंदे, कु, श्रुती तळेकर व कु रूपाली देवकर यांचादेखील या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमासाठी प्रा. गोपीनाथ शिंदे, प्रा.मालोजी पवार, प्रा.संतोष साळुंखे, प्रा. अमोल तळेकर, पत्रकार सचिन बिचितकर, ग्रामपंचायत सदस्य, श्री उत्रेश्वर देवस्थान समिती सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. काल झालेल्या या विशेष कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मालोजी पवार, प्रास्ताविक प्रा.संतोष साळुंखे, आभार प्रदर्शन प्रा.अमोल तळेकर यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE