जरांगेंची निवडणुकांमधुन माघार ; झोळ यांच्या भुमिकेकडे लक्ष
करमाळा समाचार
एका समाजावर निवडणुका लढणे शक्य नाही त्यामुळे निवडणुकांमधून माघार घेत आंदोलन तसेच चालू ठेवण्याचा निर्धार म्हणून जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकांमध्ये जाहीर केलेले उमेदवार यांनी माघार घ्यावी किंवा स्वबळावर लढावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता करमाळ्यातील जाहीर जागेवर प्राध्यापक रामदास झोळ कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
करमाळा तालुक्यात प्राध्यापक रामदास झोळ हे जरांगे पाटलाचे अधिकृत उमेदवार असतील असे जाहीर केले जाणार होते. त्या संदर्भात रणनीती ही आखण्यात आली होती. या स्पर्धेत असलेल्या इतर स्पर्धकांनी आपली नावे माघार घेतल्यामुळे झोळ यांचा रस्ता मोकळा झाला होता. पण जरांगे पाटील यांनी सदरची भूमिका जाहीर केल्यामुळे आता झोळ यांना ही निवडणुकांमध्ये अपक्ष किंवा माघार घेण्याची वेळ येऊ शकते.
मराठा समाजामध्ये प्राध्यापक झोळ यांनी वेगळं नाव निर्माण केलं आहे. प्रत्येक गावामध्ये जरांगे व झोळ यांचे समीकरण दिसून आल्याने झोळ यांना मराठा समाजातून वाढता पाठिंबा मिळत होता. आता अपक्ष उभा राहण्याचा निर्णय झोळ घेऊ शकतात. त्यामुळे जरांगेंच्या पाठिंबा शिवाय झोळ यांना मराठा समाज कितपत साथ देईल याकडेही लक्ष लागून राहिले आहे.