करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

१५ तलाव भरल्यावर तरी बहिष्कार मागे घ्या ; विश्वास उरला नाही आता बहिष्कारावर ठाम

करमाळा – विशाल घोलप

रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजुरी मिळावी यासाठी तालुक्यातील ४० गावांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्यानंतर माढा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत वर चाळीसगावच्या शिष्टमंडळाची बैठक आज पार पडली. परंतु शिष्टमंडळाने रिटेवाडी योजनेशिवाय कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याने आजची बैठक निष्फळ ठरली.

बुधवारी दुपारी चारला सुरु झालेली बैठक तब्बल दोन तास सदरची बैठक सुरू होती. या बैठकीत प्रमुख अधिकाऱ्यांसह शेतकरी व संबंधित गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुकडी आवर्तनाच्या वेळी करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील १५ तलाव भरून घेण्याचे निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

पण आज तागायत कधीच पूर्ण क्षमतेने तलाव भरले नसल्याने शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. जेव्हा पाणी येईल त्याच्यापुढे बघितली जाईल. पण तरीही जोपर्यंत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही लोकसभा मतदारसंघात मतदान करणार नाही त्यावर बहिष्कार टाकणार आहोत असे जाहीर व ठामपणे सांगितले.

यावेळी श्रीमती देशमुख यांनी लोकशाही मध्ये मतदानावर बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचे सांगितले. आपली मागणी स्थानिक पातळीवर सोडवणे शक्य नाही. तरी वरिष्ठाना याबाबत कळवले जाईल. आपण बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली. पण शिष्ठमंडळाने प्रतिसाद दिला नाही. ते आपल्या भुमीकेवर ठाम होते.

यावेळी शहाजी माने, अंकुश शिंदे, संदीप शेळके, मनोहर कोडलिंगे, मोहन मारकड, अरुण शेळके, मदन पाटील, विक्रम धायतोंडे, उमेश बरडे, राजेंद्र भोसले, प्रशांत पाटील, महेश गणगे, नानासाहेब ढाकणे, प्रवीण बिनवडे, छगन ससाने, पंकज नलवडे, किरण फुंदे, संजय रोडे, बापू पवार, केशव शेळके, भाऊ शेळके, रियाज मुलानी, प्रीतम सुरवसे, भाऊ काळे, सोनाली गायकवाड, हनुमंत खाटमोडे, सुभाष गाडे, सुभाष बलदोटा आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE