रोपळ्यात पाटलांची हवा … जयंत पाटील व नारायण पाटील यांच्या सभेला उस्फुर्त प्रतिसाद
कुर्डुवाडी प्रतिनिधी –
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या संस्थांच्या माध्यमातून भीती दाखवत पक्ष फोडाफोडी व घरफोडीचे काम भाजपा सरकारने केले त्यामुळेच आज नारायण पाटील यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून बेंद ओढा तसेच छत्तीस गावातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी सरकार पाटील यांना पुरेपूर सहकार्य करेल असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले.
शुक्रवारी दुपारी रोपळे तालुका माढा या ठिकाणी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे शरद पवार गट उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारने मागील वेळी केलेल्या चुकांचा पाढा वाचत मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचे सांगितले. तर आज दै. लोकसत्तात आलेल्या बातमींचा ही उल्लेख करीत ईडी, सीबीआयच्या धमक्यांमुळे पक्ष फोडाफोडी केल्याचेही पाटील यांनी उल्लेख केला.
करमाळा विधानसभा मतदारसंघात छत्तीस गाव असलेल्या माढा तालुक्यात सध्या पाटील गटाने प्रचाराचा जोर वाढवला आहे. या भागात नुकतीच जयंत पाटील यांची सभा पार पडली. यावेळी उपस्थिततांमध्ये पाटील यांची वेगळी क्रेझ बघायला मिळत होती. यावेळी पाटील यांनी पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन केले. तर अपक्षाला दोन्ही कडे धरला जात नाही व तो दोन्हीकडे जाण्यास मोकळा असतो. त्यामुळे अशा व्यक्तीवर कोण विश्वास ठेवत नाही. त्यामुळे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील, विष्णू भगत,संजय पाटील घाटणेकर, अॅड. सविता शिंदे, तात्यासाहेब गोडगे सुनिल तळेकर यांची भाषणे झाली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवी पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, उदयसिंह मोरे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राहुल सावंत,योगेश जाधव, सुनील सावंत, अजित तळेकर ,सुहास गलांडे दत्ता सरडे ,नागा लगडे, अभयसिंह राजेभोसले केशव चोपडे,तात्यासाहेब गोडगे, अमोल गायकवाड, अमित गाडे, शरद पाटील, विष्णु भगत, नाना खताळ, भारत गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, राजुभाऊ शिंदे, सतिश उबाळे, विलास उबाळे, अतुल पाटील जावेद शेख, हर्षल वाघमारे, शशिकांत माळी, दिगंबर अवताडे, कुबेर गवळी, अभिजीत बागल, डाॅ शशिकांत ञ्यबंके आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.