करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

फंडगल्ली येथील प्रकरणात गुन्हा दाखल ; आत्महत्या नसुन खुनच

करमाळा समाचार

अखेर पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत उमा प्रफुल पवार हिचा भाऊ दादा चव्हाण यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून प्रफुल पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे हे करीत आहेत.

शनिवारी दुपारी फंड गल्ली येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. स्वतः पतीनेच तिला मारले असल्याची तक्रार नातेवाईक सुरुवातीपासूनच करीत होते. या प्रकरणात पती प्रफुल याने पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यामध्ये उमाने गळफास घेतल्याची माहिती सर्वांना कळवल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आली की सदरचे प्रकरण हे आत्महत्याचे नसून डोक्यात काहीतरी लागण्याने झाले आहे.

त्यामुळे पोलिसांनी वेगात तपासाची चक्र फिरवली व घर व परिसरात चौकशी करून पुढील कारवाई केली. सुरुवातीला पतीने आत्महत्या केल्याची माहिती दिल्यामुळे त्याही दिशेने तपास सुरू होता. पण पतीने सांगितलेल्या माहितीत व घडलेल्या घटनेत, जखमांमध्ये तफावत आढळून येऊ लागल्याने पोलिसांनी सखोल तपास केला. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर व सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे यांनी सखोल तपास करीत आत्महत्या नसून खून असल्याचे उघडकीस आणले. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE