करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

माढा कुर्डुवाडीत राबवलेली भ्रष्टाचाराची पद्धत करमाळ्यात – जगतापांचा आरोप

करमाळा समाचार 

संजयमामा शिंदे यांनी केलेला विकास केवळ कागदावरच असल्याचा आरोप पाटील गटाकडून करण्यात आला होता. त्यावर शिंदे गटाने विकासाची सुरुवात ही कागदावरच होते असे म्हणत स्पष्टीकरण दिले होते. त्यावर जगताप यांनी मिश्किलपणे मुद्दा व्यक्त करीत माढा व कुर्डूवाडी मध्ये राबवली जाणारी पद्धत आता करमाळ्यात राबवली गेल्याचा आरोप केला आहे.

जगताप यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, विकासकामाची सुरुवात कागदावरच केली जाते हे जरी खरे असले तरी यांनी याची रचना कागदावरच केली. नंतर कागदावरच याचं काम होण्यापूर्वी बिल काढले जात आणि अशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो. प्रत्यक्षात तो विकास किंवा विकास काम नसते. त्यामुळे ते स्पष्टीकरण देत आहेत ते बरोबर आहे असे म्हणटले आहे.

politics

तर करमाळ्यात विकासावर कोण बोलत नाही असा आरोप जगताप यांच्यावरही झाला त्यावर जगताप यांनी सडेतोड उत्तर देत सांगितले की, मुळातच उजनी धरणाची निर्मिती झाली तेव्हा पासुन तालुका व परिसरातील विकासाला सुरुवात झाली यामध्ये जगताप गटाचा मोठा सहभाग आहे. याच पाण्यावर माढा तालुक्यात उसाचे पीक घेऊ लागले यावर बोलताना बबनराव शिंदे यांनीही सांगितलेय की, तिकडे तुळशीच्या लग्नाला उस मिळत नव्हता आता तिथे चाळीस लाख टन उस पिकतोय ते कुठल्या पाण्यावर पिकतोय ? जे धरण कै. नामदेवराव जगताप यांनी केलय आणि सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केलाय त्यात हा माढा आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाची सुरुवात करमाळा तालुक्यापासुन सुरु झाली. त्यामुळे ते अजुन बालवाडीतच शिकत आहेत असा टोलाही लगावला.

क्रमश ..
स्टॅंन्ड जमीन व प्रशासकीय इमारत गौडबंगाल काय ?

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE