करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील मुलाचा परांड्याच्या अल्पवयीन मुलीसोबत माढ्यात विवाह ; तिघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी करमाळा


रविवारी दि ३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा (paranda) तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यानंतर तीला करमाळा तालुक्यात आपल्या मुळ गाव गावी घेऊन येणाऱ्या नवरदेवासह तींघावर कारवाई करण्यात आली आहे.मुलीच्या आईसह तिघांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सकाळी आळसुंदे येथे करण्यात आली.

आळसुंदे येथील युवक समाधान याने परांडा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत माढा (madha) येथे लग्न केल्याची माहीती करमाळा येथे आळसुंदे गावातील ग्रामसेवक अशोक बहीर यांना समजली त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत व पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणेंना याबाबत कल्पना दिली त्यानंतर सर्व जण मिळुन एक पथक घेऊन आळसुंदे कडे रवाना झाले. त्यावेळी सकाळीच्या वेळी नवरा मुलगा हा अल्पवयीन नवरीला घेऊन देवदर्शनाला आला होता.

यावेळी दोघेही मंडवळ्या व नवरीच्या गळ्यात मंगळसुत्र, चुडा, साडी असल्याचे दिसुन आले यावरुन त्यांनी लग्न केल्याची खात्री पटली. सदरची मुलगी अल्पवयीन असताना तिच्यासोबत लग्न केल्यामुळे व लग्नाला सहकार्य केल्यामुळे तींघावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत. समाधान धारक (वय ३०) रा. आळसुंदे (karmala) असे नवऱ्यामुलाचे नाव आहे. त्याच्यासह मुलीची व मुलाच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE