आरक्षण खिडकीवर फॉर्मसाठी टोकन नंबर पद्धत चालू करण्यात यावी – प्रवासी संघटनेची मागणी
जेऊर रेल्वे स्थानकावरून करमाळा, परंडा, जामखेड या तीन तालुक्यातील प्रवासी दळणवळणासाठी येत – जात असतात व आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून आरक्षण करण्यासाठी जेऊर स्थानकावर येत असतात दिवसेंदिवस जेऊर स्थानकावर आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे
त्यामुळे स्थानकावर तत्काळ तिकीट विक्री करताना आरक्षण खिडकीवर फॉर्मसाठी टोकन नंबर पद्धत चालू करण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी यांच्याकडुन करण्यात आली आहे.
नियोजित प्रवास करतेवेळी आपल्याला कन्फर्म सीट मिळावे म्हणून प्रवासी तत्काळ तिकीट काढण्यासाठी जेऊर रेल्वे स्थानकावर येतात. परंतु दिवसेंदिवस तात्काळ तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या होणाऱ्या गर्दीतूनच काही प्रवासी तिकीट खिडकीत एक – दोन दिवस अगोदर पासूनच तत्काळ आरक्षणाचे फॉर्म ठेवून जातात. तसेच काही प्रवासी सकाळपासून फॉर्म ठेवून तिथेच हजर राहतात, परिणामी काही वेळेस पहिला नंबर कोणाचा किंवा तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांचे तत्काळ आरक्षणाचे फॉर्म पुढे मागे होतात किंवा होऊ शकतात यातून वाद-विवाद होतात व गैरसमज निर्माण होतात.
भविष्यात असे वाद-विवाद होऊ नये तसेच तत्काळ आरक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना नियमाप्रमाणे नंबर नुसार तात्काळ आरक्षण मिळावे म्हणून जेऊर रेल्वे स्थानकावर तत्काळ तिकिटांसाठी तर नंबर लावून टोकन पद्धत चालू करण्यात यावी. असे केल्यास कोणतेही वाद विवाद होणार नाहीत तसेच सर्वांना नियमाप्रमाणे तत्काळ तिकीट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी प्रमोद जानकर, सुनील अवसरे, अल्लाउद्दीन मुलांनी, तात्यासाहेब कळसाईत, पोपट माने, सलीम पठाण, तुषार घोलप, गणेश अमरुळे आदि उपस्थित होते.