करमाळासोलापूर जिल्हा

डॉक्टर पुत्राच्या तक्रारीनंतर जेऊर च्या माजी सरपंचावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

समाचार टीम


ग्रामपंचायत मालकीची जागा स्वतःच्या मालकीची भासवून तशा प्रकारचे खोटे ग्रामपंचायत उतारे तयार करून सदर जागा विक्री करून फसवणूक केल्या प्रकरणी जेऊर येथील ओम हेमंत पांढरे रा. जेऊर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ४२०,४६५,४६६,४६७,४६८,४७१ अंतर्गत माजी जेऊर चे माजी सरपंच भास्कर पांडुरंग कांडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओम पांढरे हे डॉ. हेमंत पांढरे यांची सुपुत्र आहेत. 2021 मध्ये माजी सरपंच भास्कर खांडेकर यांच्यासोबत गावातील एक गुंठा जागेचा व्यवहार हा या दोघांमध्ये झाला होता. याबाबत संबंधित कागदपत्रांची जवळजवळ करून खांडेकर यांनी 80 हजार रुपयात जमिनीचा व्यवहार केला होता.

पण काही दिवसांनी पांढरे यांनी जेऊर ग्रामपंचायत येथे चौकशी केली असता त्यांना लक्षात आले की सदरचा गट नंबर मधील जागा ही ग्रामपंचायत मालकीची आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पांढरे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे. यावरून माजी सरपंच भास्कर कांडेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची जमिनीचा व्यवहार हा पांढरे व कांडेकर यांच्यादरम्यांचा असून यामध्ये ग्रामपंचायतचा कसलाही संबंध असल्याचे बाब समोर येत आहे. याप्रकरणी जेव्हा व्यवहार झाला तेव्हा माजी सरपंच कांडेकर हे पदावर नव्हते. तर यामध्ये ग्रामपंचायतीचा कोणता सहभाग नसल्याचे प्राथमिक स्वरूपाचे दिसून येत आहे. तपासात इतर बाबी निष्पन्न होतील.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE