जगदाळेमामा जयंतीनिमित्ताने शेलगाव (वांगी) येथे मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन
करमाळा समाचार
कर्मवीर डाॅ मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त जगदाळे मामा हाॅस्पिटल बार्शी व आष्टविनायक मित्र मंडळ शेलगाव (वांगी) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दु ०१ या वेळेत मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे डाॅ वैभव पाटील व नागनाथ केकान यांनी दिली आहे.

या शिबिरा मध्ये जगदाळे मामा हाॅस्पिटल मधील सर्व अजारावरील तज्ञ असलेल्या पन्नास डाॅक्टरांचे पथक रुग्णांची तपासणी करणार असून ह्रदय रोग, हस्ती विभाग, बाल तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,कान नाक घसा, श्वसन विकार या संबंधित आजाराची तपासणी तसेच मोफत इ सी जी,ब्लड शुगर, ब्लड प्रेशर तपासणी करण्यात येणार आहे तसेच शिबीरातील पेशंट साठी विशेष सवलत देण्यात येणार आहे .

तरी तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवहान नागनाथ केकान यांनी केले आहे . अधिक माहिती साठी 8975008937 या मोबाइल नंबर वर संपर्क साधवा .