करमाळासोलापूर जिल्हा

आ. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे ५०० नागरिकांचे लसीकरण

प्रतिनिधी – करमाळा 

जेऊर येथे आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश पाथ्रूडकर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे, नितीन खटके पाटील यांच्या प्रयत्नातून कोरोना लसीकरणाचे शिबीर आज आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील लसीकरणाचा लाभ 500 नागरिकांनी घेतला.

यावेळी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील , आनंद पतसंस्था चेअरमन अभयराज लुंकड, कार्यकारी संचालक डांगे साहेब , ग्रामपंचायत सदस्य देवानंद पाटील, निकील मोरे, शहाजी कोंडलकर, मेजर आनंद पवार हे मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीत युवकांना पोलीस भरती व सैनिक भरतीसाठी आवश्यक करण्यात आलेल्या लसीकरणाच्या नियमामुळे अनेक तरुणांना या लसीकरणाचा लाभ झाला. तसेच व्यापारी पेठेतील व्यापारी व कामगार यांना या शिबिराचा फायदा झाला . त्याबद्दल सर्वसामान्य जनतेने आमदार संजय मामा शिंदे यांचे धन्यवाद मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय जेऊर चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .या शिबिरासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजिनाथ माने, समीर केसकर, धनंजय गारुडी, सागर लोंढे, शिवम कोठावळे, बाबू शिंदे, अतुल निर्मळ, रणजित कांबळे, लतेश घनवट आदी युवकांनी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE