शहीद जवान नवनाथ गात यांचा वरकुटे येथे 2 मार्च रोजी स्मृतीदिन .
करमाळा समाचार
वरकुटे मूर्तीचे ता.करमाळा येथील शहीद जवान नवनाथ गात यांचा 22 वा स्मृती दिवस त्यांच्या वरकुटे मूळ गावी विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याचे शहीद जवान स्मारक समिती वरकुटे व आ. मा.सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा यांच्यावतीने कळविण्यात आले आहे. रविवार दि.2 मार्च रोजी शहीद जवान नवनाथ गात यांचा 22 व्या स्मृतीदिन साजरा केला जात आहे त्यानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे . या स्मृतीदिन सोहळ्याचे उद्घाटन करमाळा माढा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री. नारायण आबा पाटील यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष मा.अॅड श्री. बाबुराव आबा हिरडे असणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याचे तहसिलदार मा. शिल्पाताई ठोकडे, भाजपा महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा मा.रश्मी दिदी बागल-कोलते, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा.गणेश करे-पाटील सर, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा.रामदास झोळ सर , वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा. विनोद घुगे साहेब , आ. मा. सैनिक कल्याणकारी मंडळाचे करमाळा तालुका अध्यक्ष मा. अकुर शिंदे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शहीद जवान मच्छिंद्र वारे यांचा मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री.रामदास कोकरे साहेब यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. फिसरे येथील मा. श्री.हनुमंत रामभाऊ रोकडे यांना कृषी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर जयहिंद नारायण जगताप यांस क्रिडा क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जि.प. शाळा पुंजहिरा वस्ती वांगी नं 1 या शाळेला आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात येणार आहे.
या समारंभास मा. श्री. केमचे अजितदादा तळेकर, योध्दा अॅकॅडमीचे कॅप्टन विलास नाईकनवरे, माढाचे, मा. अभिजित आबा साठे , करमाळ्याचे मा. सभापती मा. शेखर तात्या गाडे, चिंचवडचे मा.अॅड. रामराजे भोसले. रोपळेचे प्राचार्य योगेश दळवे, अळसुंदेचे सरपंच सोमनाथ आबा देवकाते, साडेचे मा. देविदास ताकमोगे सर, रोपळेचे सरपंच मा. तात्यासाहेब गोडगे, घोटीचे मा. सरपंच सचिन आण्णा राऊत, मा. धनाजी तडवळेचे मा.सरपंच परबत,उद्योजक मा.महेश बंटी जाधव, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. प्रा.बाळकृष्ण लावंड सर, पारगावचे उद्योजक मा. मुंकुंद भोसले,, सिरसावचे उदयोजक मा.गोकुळ मुके, बीडचे उद्योजक मा.बप्पासाहेब जावळे, अळसुंदे वि.से. सा. चे सचिव मा. सदाशिव पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार असून देशप्रेमी नागरिकांनी या भव्य स्मृतीदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शहिद जवान नवनाथ गात स्मारक समिती वरकुटे (मुर्तीचे ) आणि आ. मा. सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा यांनी केले आहे.