करमाळासोलापूर जिल्हा

शिक्षकाच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना जामीन मंजुर

करमाळा समाचार

गुळसडी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वारे यांच्या आत्महत्या या प्रकरणातील संशयित आरोपी हनुमंत बागल व रमेश यादव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

सदर प्रकरणांमध्ये जून 2021 मध्ये हनुमंत बागल व रमेश यादव गुळसडी येथील शिक्षक वारे यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

आयपीसी कलम 306,506,34 प्रमाणे सदर प्रकरण बार्शी न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली सदर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी 25000 रुपये आरोपीचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे एडवोकेट अनिकेत निकम , भाग्यश्री शिंगाडे-मांगले व अमर शिंगाडे यांनी काम पाहिले

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE