राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल झोळ यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मान सोहळा
प्रतिनिधी वाशिंबे
राजुरी ता.करमाळा येथील राजेश्वर विद्यालयाचे मुख्य ध्यापक अनिल सोपान झोळ यांच्या सेवापूर्ती निमित्त राजेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार ता.२७ रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे संस्थापक सचिव लालासाहेब जगताप होते.

यावेळी लालासाहेब जगताप यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक अनिल झोळ यांच्या सुरवातीपासून सेवानिवृत्ती पर्यंतच्या खडतर परिश्रमातून केलेल्या वाटचालीला ऊजाळा देत ३६ वर्ष केलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल गौरवउद्गार काढले. यावेळी मुख्याध्यापक अनिल झोळ यांचा सपत्नीक सत्कार वैजनाथ स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने करण्यात आला.

मुख्याध्यापक अनिल झोळ यांनी १९८९ ते २०२५ अशी एकूण३६ वर्ष सेवा करुन निवृत्त झाले. यामध्ये ३० वर्ष सहशिक्षक तसेच ६ वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. यावेळी बोलताना कृषि अधिकारी देविदास सारंगकर, प्रा.संजय चौधरी, वाशिंबे प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश यादव, गंगाराम वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करत झोळ यांच्या कारकीर्दीवर उजाळा टाकून गौरवोद्गार व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यासेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी वाशिंबे, राजुरी, मांजरगाव, उंदरगाव येथील मा.विद्यार्थी यांसह सर्वच क्षेत्रातील राजुरी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय साखरे यांनी केले.तर आभार मारुती साखरे यांनी मानले.
सद्या अमेरीका येथे नामांकित कंपनीत उच्चपदावर
कार्यरत असलेले राजुरी गावचे सुपुत्र राजेश्वर विद्यालयाचे मा.विद्यार्थी संतोष सारंगकर यांनी शाळेबद्दल व झोळ सरांबद्दल असलेल्या प्रेमापोटी मोबाईल द्वारे ध्वनी मुद्रण करुन शाळा व्यवस्थापनास शुभेच्छा पाठवल्या. शाळा व्यवस्थापनाने सेवापूर्ती कार्यक्रमात ध्वनिक्षेपकावरुन दिलेल्या शुभेच्छा सर्वाना ऐकवल्या. तसेच झोळ सरांच्या सेवापूर्ती निमित्त सारंगकर यांनी झोळ सर व सर्व शिक्षकांस अमेरिकेमधून भेट वस्तू ही पाठवून दिल्या असून विध्यार्थ्यांसाठी १लाख २० हजार किमतीच्या ४०बेंच ही सारंगकर यांनी दिल्या आहेत