करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात पदविधर निवडणुकीत जेऊर, केम व करमाळा ठरणार निर्णायक

करमाळा समाचार


तालुक्यात ज्या पद्धतीने अर्ज भरून मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी पदवीधरांनी प्रयत्न केले होते. परंतु त्यालाच स्वतःलाच मतदान करण्यासाठी उपस्थित न राहिल्याने फक्त 61 टक्के एवढीच उपस्थिती पदवीधरांनी लावली आहे. त्यासाठी लांब असलेले मतदान केंद्र व परगावी असलेले मतदार हे ही कारणे असू शकते. पण निवडणुकांपूर्वीच पदवीधरांपैकी जे पदवीधर अर्ज भरतील त्यांनाच मतदानाचा अधिकार होता. पण तरीही असे पदविधर गैरहजर राहीले.

करमाळा तालुक्यात २८९५ पदविधरापैकी १४८७ पुरुष व २८५ महिला असे १७७२ मतदारांनी आणी शिक्षक मतदार संघातील ५४९ मतदारातुन ४०० पुरुष व ६६ महिला मतदार असे ४६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळच्या निवडणुकीत आज पर्यत झालेल्या पदविधरांच्या निवडणुकांपेक्षा जास्त उत्साह दिसुन आला. पण पदविधर मतदारांनी कष्टाने भरलेल्या अर्जालाही मतदानात परिवर्तीत केले नाही.

झालेले मतदान
सालसे : १६९ –
जेऊर: ३०७ –
करमाळा : २८३-
करमाळा : २५३,
करमाळा : २२५,
कोर्टी : १७६-
केम: २३२-
केतुर: १२७

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE