अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्याकडुन राम मंदीरास फ्रीज भेट
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात असलेली हिंदू – मुस्लिम ऐक्याची भावना पाहून आनंद झाला. यापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी काम करीत होतो त्या ठिकाणीही असेच अनुभव पाहायला मिळायचे. शहरातील श्रीराम मंदिरात सीसीटीव्ही तसेच पाण्याचा फ्रिज घेण्याचे काम मुस्लिम समाजाने केले आहे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. तर प्रत्येक वेळी गणपती मिरवणुकांवर मशिदी वरून होणारी पुष्पवृष्टी हेही काम अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व्यक्त केले.

ते करमाळा येथील वेताळ पेठ परिसरातील श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी करमाळा तालुक्यातील सकल मुस्लिम समाज तसेच एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्या वतीने मंदिरास पाण्याचा फ्रिज भेट म्हणून देण्यात आला याशिवाय यापूर्वी सीसीटीव्ही देण्यात आले होते. तर मंदिर समितीच्या वतीने परिसरात बोअर घेतलेला आहे. त्या बोअरचे पूजनही यावेळी करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकर्त्यांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोलिस उपनिरिक्षक गिरिजा मस्के, ॲड. बाबुराव हिरडे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी नगरसेवक अतुल फंड,पै दादासाहेब इंदलकर, पोथरे गावचे नेते धनंजय शिंदे आदि उपस्थित होते.
तर मंदीर समितीकडुन विजय देशपांडे, दर्शन कुलकर्णी, महेश परदेशी, रुपेश वनारसे यांनी नियोजन पाहिले. यावेळी अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लिम समाजावतीने प्रमुख समीर शेख यांच्यासह जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, अॅड नईम काझी, डॉ सादीक बागवान, नासीर कबीर पत्रकार , फारुख जमादार, मुस्तकिम पठाण, कलीम शेख, इकबाल शेख, जावेद सय्यद, शाहिद बेग, अरबाज बेग, आलीम पठान, आरीफ पठान, फिरोज बेग, कलंदर शेख, यासीन सय्यद आदि उपस्थित होते.