करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

बंद च्या अफवेमुळे नाहीतर चांगला भाव दिल्याने आवक वाढली – सभापती बंडगर

प्रतिनिधी – सुनिल भोसले


करमाळा बंदच्या अफवेमुळे उडीदाची आवक वाढली हे वृत्त खोटे असून करमाळा बाजार समितीमधे उडीदाची आवक हि बाजारात मिळणाऱ्या उच्च दरामुळे व विश्वासार्हतेमुळे असून शहरात बंद होवो अथवा न होवो शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी बाजार समितीत सौदे नियमीतपणे सुरु आहेत व ते सुरुच राहणार आहेत अशी माहिती सभापती प्रा . शिवाजीराव बंडगर यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना प्रा .बंडगर यांनी सांगीतले कि, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे उडीदाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले . करमाळा बाजार समितीत असलेला चोख व्यवहार, त्वरीत मापे व पट्टी यामुळे शेतकऱ्यांचा करमाळा बाजारपेठेवर विश्वास आहे . परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा बंदच्या उलटसुलट चालू असलेल्या चर्चेमुळे उडीदाचे भाव पडले व आवक वाढली तसेच दीड हजारानी दर पडले असे वृत्त काही मंडळी पसरवित आहेत .

यात वस्तुस्थिती अशी आहे कि, करमाळा बाजार समितीत नियमीतपणे व सुरळीत सौदे सुरु असून दि २६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर अखेर एकूण २७०१४ पिशव्यांची एकूण २०००० क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान दर ४०००, सरासरी दर ५६०० व कमाल दर ६४०० पर्यंत मिळालेला आहे . तरी शेतकऱ्यांनी खोट्या अफवेवर व वृत्तावर विश्वास न ठेवता करमाळा बाजारातील दर व आसपासच्या तसेच राज्यातील अन्य बाजारपेठातील दरांची तुलना करून खात्री करावी . यात काही अडचण अथवा शंका वाटल्यास माझ्याशी वबाजार समितीचे सचिव सुनील शिंदे ( मो . नं. ९८८१६५३४३६ ) यांचेशी संपर्क साधावा . असे आवाहन प्रा .बंडगर यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE