कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई ; तीन महिलांची सुटका चालकाला पोलिस कोठडी
करमाळा समाचार
तालुक्यातील वीट येथे अवैधरित्या सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकुन तीन महिलांची मुक्तता करण्यात आली आहे. सदरची कारवाई रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी वीट येथील साईलीला हॉटेल याठिकाणी सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये संबधीत हॉटेल चालकाला ताब्यात घेतले असुन दि ७ पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सदरची कारवाई म.स.पो.नि./म्हस्के, पो.उप. निरी./ चंदनशिव, स.पो.उप. निरी. / शिनगारे, पो.हवा./१५० लोहार, पो.हे.कॉ/१३० महेश डोंगरे, मिलिंद दहिहांडे, पो.शि./२१४० शिंदे, पो.शि./१७४८ घोगडे, म.पो.शि./१६६ पारधी यांच्या पथकाने केली.
पोलिसांना मिळेल्या माहिती नुसार मौजे वीट गावचे शिवारात एक इसम अवैध कुंठण खाना चालवित असल्याची माहीती मिळाली होती. करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील हॉटेल साईलीलाचे पाठीमागे पाझर तलावाजवळ, मौजे वीट, ता. करमाळा या ठिकाणी एक इसम काही महीलांना डांबुन ठेऊन त्यांचेकडुन अनाधिकृतपणे जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या खोलीमध्ये जावुन छापा कारवाई करून तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची ताब्यात घेतले आहे.

यावेळी संतोष जगदाळे, (वय ४१) वर्षे रा. वीट, ता. करमाळा याचेकडे पोलीसांनी पंचासमक्ष विचारणा केली असता नमुद शेड हे त्याच्या मालकीचे शेतात बांधलेले असुन त्यामध्ये तो नमुद महीलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगीतले. त्यामुळे जगदाळे हा वेश्याव्यवसायासाठी महीला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस हवालदार महेश डोंगरे यांने फिर्याद दिली.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. रणजीत माने, स.पो.नि./ पोपट टिळेकर, म.स.पो.नि./म्हस्के, पो.उप.निरी. / चंदनशिव, स.पो.उप. निरी./ शिनगारे, पो. हवा./१५० लोहार, पो. हे. कॉ/१३० महेश डोंगरे, पो. शि./२१४० शिंदे, पो.शि./१७४८ घोगडे, म.पो.शि. /१६६ पारधी, पो.हवा./अजित उबाळे, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो.शि. /१५५० तौफिक काझी, पो.शि./१७४८ ज्ञानेश्वर घोगडे, पो.शि./११४३ सोमनाथ जगताप, पो.शि. /८५६ अर्जुन गोसावी, पो.शि./२१४२ गणेश शिंदे, पो.शि./६८९ योगेश येवले, पो.शि./४३८ रविराज गटकुळ, पो.शि./१५२४ अमोल रंदील यांनी केली.