करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पालकमंत्र्याच्या गाडीत बसुन राजकीय खलबते ; आणखी एका नेत्याचा भाजपा प्रवेश निश्चित

करमाळा समाचार

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आणखी काही धक्कादायक प्रवेश करमाळा तालुक्यातील होताना दिसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रा. रामदास झोळ तर करमाळा शहरातून नागरिक संघटनेचे प्रमुख कन्हैयालाल देवी यांची नावे आघाडीवर आहेत. नुकतंच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पूर्णवेळ प्रांत अधिकारी मिळावेत या मागणीसाठी सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला त्यादरम्यान प्रवेशाबाबतही खलबते झाल्याचे दिसून आले.

तालुक्यातील होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय भूकंप होताना दिसून येत आहेत. मागील बराच काळ सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठानला सोलापूर येथे दिव्य मराठीच्या माध्यमातून दिला जाणारा टॉप फिफ्टी हा पुरस्कार जाहीर झाला व त्यांना सदरच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित ही करण्यात आला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला याच कार्यक्रमाच्या नंतर गणेश चिवटे हे थेट पालकमंत्री यांच्या गाडीमध्ये बसून पुढील प्रवास केला.

दरम्यान पालकमंत्री यांच्या शासकीय विश्राम गृह या ठिकाणी गेल्यानंतर तालुक्यासह कुर्डूवाडी विभागासाठी अत्यंत गरजेचे असलेले प्रांत अधिकारी व त्यांच्या नियुक्तीवरून चर्चा झाली. यावेळी करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न व विविध कामे रखडले असून तात्काळ कायमस्वरूपी प्रांताधिकारी ची नियुक्ती करावी ही मागणी चिवटे यांनी केली. याला हिरवा कंदिल मिळाला.

ads

तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी प्रवेशाबाबत फोनवर चर्चा केली. याशिवाय सोलापूर येथे पालकमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा करून तालुक्यातील नागरिक संघटनेचे प्रमुख कन्हैयालाल देवी यांच्या प्रवेशाबाबत चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच त्यांचा प्रवेश पुणे येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सदरच्या बैठकीनंतर वेळ निश्चित झाली असून पुढील माहिती लवकरच जाहीर केली जाईल असा सूचक इशारा यावेळी भाजपा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिला.

लवकरच शिक्कामोर्तब…
अर्बन बॅंकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी यांचं शहरातील राजकारणात तसेच त्यांचे वडील स्व. गिरदारासदेवी यांचे तालुक्याच्या राजकारणात मोठ योगदान राहिलेला आहे. मागील दोन विधानसभा निवडणुका कन्हैयालाल देवी यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासोबत लढले आहेत. करमाळा शहरात देवी यांची ताकद मोठ्या प्रमाणावर असून देवी यांच्या प्रवेशामुळे भाजपला ताकद वाढणार आहे. तर अपक्ष उमेदवार रामदास झोळ यांच्याही नावाची चर्चा असून झोळ यांनी याबाबत जाहीर स्पष्टता केली नसली तरी त्यांच्याही प्रवेशावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE