करमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाढामाळशिरसमोहोळराजकीय

सतरा जिल्ह्यातील 92 नगरपरिषद व चार नगरपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती

करमाळा – अमोल जांभळे 

17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद व चार नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम आठ जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत एक सुनावणी 19 तारखेला होत असल्याने जाहीर करण्यात आल्याने सर्व निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती अव्वर सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र संजय सावंत यांनी दिली आहे.

आठ जुलै रोजी महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद व चार नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दिला होता. मा सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनवाई 12 जुलै रोजी झाली.

त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात पुढील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवलेली आहे. सदर पार्श्वभूमीवर आयोगाच्या आठ जुलै रोजी देण्यात आलेल्या राज्यातील 92 नगर परिषदा व चार नगरपंचायत मधील सदस्य पदाची सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणुका कार्यक्रम यामुळे स्थगित करण्यात आली आहे.

सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम नंतर देण्यात येईल अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागे जाहीर करण्यात आलेल्या करमाळ्यासह इतर निवडणुका सध्या स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा मतदार व नव्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले नगरसेवक यांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. तर येणाऱ्या काळात नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाऊ शकतो. त्यामुळे आता मागे जी रचना केली होती ती रचना पुढे कायम राहते का हेही पाहण्यासारखे राहील.

त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी, मोहोळ, अनगर, सांगोला, मंगळवेढा, अकलूज, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी या नगरपालिकांची निवडणूक होणाऱ होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE