जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन” चव्हाण महाविदयालया संपन्न
करमाळा समाचार
येथील यशवंतराव चव्हाण महाविदयालय, करमाळा येथील विजयश्री सभागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. मनोज एस. शर्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.एम.पी. शिंदे व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. संजय मो. घुगे यांचे मार्गदर्शनानुसार कायदेशीर शिबीर या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, करमाळा श्री. संजय मो. घुगे व सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, करमाळा श्री. ए.के. शर्मा तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अॅड आर.बी. निळ, उपाध्यक्ष श्री. अॅड. ए.एच.पठाण, सह सचिव अॅड. इंगळे, अॅड. पिंपरे, करमाळा बार आसोसिएशनचे जेष्ठ विधीज्ञ श्री. डी. एम. सोनवणे, अॅड.जे.डी. देवकर व यशवंतराव चव्हाण महाविदयालयाचे प्राचार्य श्री. लक्ष्मण पाटील, उप प्राचार्य श्री. किरदार सर हे मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यकमाचे सुत्र संचलन प्रा. श्री. एन.एल. तळपाडे यांनी केले तर प्रस्ताविक अॅड. श्री. ए. एच. पठाण यांनी केले. सदर कार्यक्रमास अॅड.डी.एम. सोनवणे यांनी मुलांचे हक्क व बाल न्याय कायदा-२०१५, अॅड. जे.डी. देवकर यांनी नागरिकांचे मुलभूत कर्तव्य हे विषय विदयार्थ्यांना समजावून सांगितले व मा.श्री. ए.के. शर्मा यांनी शिक्षणाचा अधिकार व बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर तसेच प्राचार्य श्री. लक्ष्मण पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

मा. न्यायाधीश श्री. संजय मो. घुगे यांनी अध्यक्षीय भाषणात जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन व POSH Act. व इतर विषय सारांशमध्ये समजावून सांगून सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाविदयालयाचे प्राध्यापक वर्ग व महाविदयालयीन विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री. कृष्णा कांबळे यांनी केले.