करमाळासोलापूर जिल्हा

या कारणामुळे आ. गोपीचंद पडळकारांनी करमाळ्यात बोलणे टाळले ; उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट

करमाळा समाचार 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच आरक्षणाविषयी आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे चौंडी ला आले होते त्यानंतर त्यांनी करमाळा येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी इतर विषयांवर बोलणे टाळले याप्रसंगी त्यांनी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला

भाजपाला सात वर्ष सत्तेत झाल्यानंतर अखंड देशभर समर्पण दिन साजरा करत असल्याने जे लोक तोरणा काळात काम करत होते अशा लोकांचा सत्कार यावेळी परकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अतुल खूपसे पाटील. माऊली हळनवर, भाजपचे दीपक चव्हाण, शशिकांत पवार, जगदीश आगरवाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी करमाळ्यातील पत्रकारांचे कार्यालय करमाळा कट्टा येथे गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. परंतु इतर कोणत्याही विषयावर बोलणे टाळले. ते म्हणाले की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे कार्यक्रम झालेला आहे. त्याशिवाय धनगर आरक्षणावरून जे काही चर्चा झाली. त्या संबंधित होणाऱ्या कार्यक्रमात बद्दल त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. तरी या ठिकाणी काही बोलल्या नंतर वेगळ्याच बातम्या होतील व मुख्य विषय बाजूला पडेल. त्यामुळे पत्रकार परिषद घेण्याचे टाळले. फक्त औपचारिक भेट देऊन पडळकर मार्गस्थ झाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE