मारकड कुस्ती केंद्राची शालेय सामन्यात दमदार कामगिरी
करमाळा समाचार

भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र लोणी देवकर येथे संपन्न झाल्या त्यामध्ये मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथील कुस्ती मल्लांनी दमदार खेळ करत तालुक्यांमध्ये 18 सुवर्णपदकाचे मानकरी ठरले
व त्यांची पुणे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून तालुक्यामध्ये व सर्व सामान्य जनतेमध्ये तसेच कुस्ती क्षेत्रामध्ये मारकड कुस्ती केंद्राचे कौतुक केले जात आहे.

या कुस्तीमल्लांना घडविण्यासाठी एन आय, एस ,कुस्ती कोच मारुती मारकड सर, तसेच एन ,आय ,एस ,कुस्ती कोच सागर मारकड, तसेच एन, आय, एस कुस्ती कोच मंजित सिंग हरियाणा, तसेच वस्ताद गोविंद निकम अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा सराव घेतात त्यामुळे मारकड कुस्ती केंद्राचे नाव आज महाराष्ट्रभर गाजत आहे. सध्या मारकड कुस्ती केंद्र मध्ये लहान मोठे 145 कुस्ती मल्ल सराव करत आहेत.
मारकड कुस्ती केंद्र मध्ये कुस्ती व शालेयशिक्षण तसेच मुलांवरती चांगले संस्कार घडवण्याचे काम वस्ताद सागर मारकड व वस्ताद गोविंद निकम हे उत्कृष्टपणे पार पाडत आहे. त्यामुळे कुस्ती मल्लांची मारकड कुस्ती केंद्राकडे येण्याची ओढ लागण्याचे चित्र दिसून येत आहे.


