करमाळासोलापूर जिल्हा

अखेर करमाळा तालुक्यातील वीज पुरवठ्यावर तोडगा निघाला दिग्विजय बागल यांच्या आंदोलनाला यश

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील खंडीत केलेला वीज पुरवठा ‌सुरळीत करण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे तोडगा निघाला. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज रास्तारोको आंदोलन केले होते. यामध्ये तालुक्यातील पूर्व भागासाठी प्रती कनेक्शन अडीच रुपये, तर पश्चिम भागासाठी प्रती डीपी चाळीस हजार रुपये भरण्याचा तोडगा निघाल्यानंतरच आजपासून वीज पुरवठा चालू करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील पहिले वीज‌ पुरवठा आंदोलन यशस्वी करण्यात आल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

आंदोलनास सुरुवात करण्यापूर्वी २६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. करमाळा येथील मुख्य चौक झालेल्या नगर-सोलापूर हायवेवरील मौलाली चौक येथे हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास शेतकऱ्यांचा उस्फुर्त सहभाग होता. आंदोलनाच्या मुख्य मागण्या मंजूर झालेल्या नंतरच आंदोलन थांबवण्यात आले. या आंदोलनाला पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी यांनी सहकार्य केले. दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील वीज पुरवठा काढलेल्या या तोडग्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी सीना-कोळगाव धरणग्रस्त संघटना, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, बागल गटाचे आजी-माजी पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, विविध गावचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

अधिकारी ठाम, नेते – आंदोलनकर्ते ठाम त्यामुळे निघत नव्हता तोडगा. तेव्हा पोलिस निरिक्षक झाले आक्रमक अखेर योग्य दिशेने बोलणी होऊ असा निघाला तोडगा – *विडिओ*
मोठ्या वादावादीनंतर अखेर तोडगा ; बागलांच्या विजयाच्या घोषणाबाजीने आंदोलनाची सांगता

गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले. आजपासून वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तालुक्यातील पूर्व भाग प्रती कनेक्शन अडीच हजार रुपये, तर पश्चिम भाग प्रती डीपी चाळीस हजार रुपये भरण्यात यावे असे महावितरण अधिकारी आणि ‌शेतक-यामध्ये तोडगा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर यापुढे आम्ही लढत राहू. आजचे आंदोलन आपण शेतकऱ्यांमुळेच यशस्वी करू शकलो… दिग्विजय बागल, चेअरमन श्री मकाई सहकारी साखर कारखाना…

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE