चोरींच्या घटनात वाढ ; गवताला गेलेल्या महिलेचे गळ्यातील अज्ञात चोरटे हिसकावून पळाले
करमाळा समाचार
एकटी महिला पाहून तिच्या गळ्यातून हिसकावून नेण्याचे प्रकार आता ग्रामीण भागात दिसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवसेंदिवस करमाळा तालुक्यातील चोरट्यांची दहशत वाढत चाललेली चित्र सध्या निर्माण झाले आहे. शुक्रवारच्या बाजारात चोरट्यांकडून चोरांचे प्रकार घडत होते. बस स्थानकावरही चोरी करून पळून जात होते. परंतु आता रस्त्यावरून चालणार महिलाही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही हे प्रकार घडताना दिसत आहेत.

कुंभारगाव येथील येथील महिला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतातून गवत घेऊन घराकडे जात असताना मोटरसायकलवर तीन अनोळखी इसम आले. त्यांच्या गाडीला नंबर प्लेट ही नव्हता. भरधाव वेगात आले व त्यांनी संबंधित महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाची मनी मंगळसूत्र ओढून नेले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभारगाव येथील 40 वर्षीय महिला शेतातून गवत घेऊन घरी परतत असताना घराजवळील टेंभी आईच्या मंदिराजवळ पोहोचल्यानंतर पाठीमागून एका नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवर तीन अनोळखी इसम आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. जवळ आल्यानंतर त्यांनी मोटरसायकल थांबून डोक्यावरची पेंडी ढकलून दिली व गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले. त्यावेळी महिलेने जोरात आवाज केल्याने तिघेही मोटरसायकलवर बसून गेले.

त्यानंतर महिलेचा आवाज ऐकून त्या ठिकाणी महिलेचे पती पळत आले. सदरचे तिघे जिंतीच्या दिशेने निघून गेले आहेत. सदरची घटना दिनांक 8 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. याची तक्रार दि 13 रोजी देण्यात आली.
